Type Here to Get Search Results !

जमिनीचा दर बुडा आयुक्तांनी केलाय निश्चित


जमिनीचा दर बुडा आयुक्तांनी केलाय निश्चित

दलाल सदस्यांनी मांडले मत; खादरवाडी जमीन प्रकरणात वेगळी कलाटणी 



बेळगाव : खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला आता नवी कलाटणी आली आहे. खादरवाडी गावच्या शेतकऱ्यांनी काल गावात निषेध मोर्चा, निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी बैठकीमध्ये संपूर्ण गावांसमोर आपले म्हणणे मांडले. यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम बुडा कमिशनरने ठरविल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे या खादरवाडीच्या जमीन प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे. कारण जमीन खरेदी करणारे दुसरे आणि जमिनीचा व्यवहार ठरवणारे कोणीतरी वेगळे. 



त्यामुळे या व्यवहारात काही ना काही चुकीचे घडलंय असे संपूर्ण गावातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. आणि बुडाच्या कागदपत्रांनुसार बुडाने दिलेल्या रेटनुसार हा व्यवहार बुडाने 1 कोटी 8 लाख प्रती एकर असा ठरलेला असताना गावच्या शेतकऱ्यांना फक्त एकरी एक लाख देण्यात आले यामुळे खादरवाडीच्या शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या