Type Here to Get Search Results !

चलवेनहट्टीत स्वागत कमानीचे मोठया उत्साहात उद्घाटन



चलवेनहट्टीत स्वागत कमानीचे मोठया उत्साहात उद्घाटन


बेळगाव : चलवेनहट्टी येथे गावच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. आजी - माजी सैनिक संघटनेच्या स्वखर्चाने स्वागत कमान उभे करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील हे व्यासपीठ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्दनेवर तसेच करीहाळ व बेक्कीनकरे येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अनुक्रमे नारायण बसर्गे व चंद्रकांत गावडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मल्लाप्पा बडवाणाचे यांच्या हस्ते करण्यात आले तर सैनिकांच्या नामफलकाचे पुजन नारायण बसर्गे तसेच चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर  स्वागत कमानीचे उद्घाटन चलवेनहट्टी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तत्पूर्वी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनीनी ईशस्तवन तसेच स्वागताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तर प्रमुख पाहुण्याचे शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. सामाजिक सेवेतील व गावातील व्यक्तीचे विविध मंडळाच्या अध्यक्षासह उपस्थितांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोतिबा पाटील यांनी केले. तसेच स्वागत कमान उभे करण्याचा मुख उद्देश सांगितला. यावेळी अमृत मुद्दनेवर यांनी आपले मनोगत मांडताना सैनिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. यावेळी चंद्रकांत गावडे यांनी आशा सैनिक संघटना प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. 

यावेळी कमान बांधकामांचे कल्लेहोळ येथील इंजिनिअर विनायक पाटील तसेच सेंट्रीग मेसरी भुषण पाटील, गवंडी मेसरी जोतिबा कितवाडकर, यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, तसेच सैनिक संघटनेतील निंगाप्पा हुंदरे, जोतिबा पाटील, नारायण हुंदरे, जोतिबा बडवाणाचे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर हुंदरे यांनी केले तर अभार प्रदर्शन संतराम आलगोंडी यांनी केले. यावेळी मल्लाप्पा हुंदरे, परशराम पाटील, मारुती पाटील, मनोहर राजाई, दिपक हुंदरे, परशराम बडवाणाचे, मोहन हुंदरे, परशराम आलगोंडी, निंगानी हुंदरे, प्रकाश बडवानाचे, लक्ष्मण बडवाणाचे, कल्लाप्पा पाटील, तानाजी पाटील, मारुती हुंदरे, कुमाण्णा हुंदरे, नंदा हुंदरे, रेणुका सनदी, अप्पयगौडा पाटील, शहूप्पा पाटील, मल्लाप्पा शट्टू हुंदरे, गुरुनाथ पाटील, इराप्पा कलखांबकर, भक्तेश पाटील, नागराज पाटील, अमर नाथबुवा, अनिल पाटील, बाळु पाटील आदी उपस्थित होते.





-----------------------4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या