Type Here to Get Search Results !

भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकाससावर बंधने

 भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकाससावर बंधने ;  गिरीश पतके 

साठे प्रबोधनीच्या वतीने बक्षीस वितरण सोहळाचे आयोजन 



बेळगाव, ता. ११ : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि.गो.साठे  मराठी प्रबोधनी यांच्यावतीने निबंध व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी सन्माननीय गिरीश पतके उपस्थित होते.



यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर ,खजिनदार मालोजी अष्टेकर उपस्थित होते. मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी गिरीश पतके यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. श्री गिरीश पतके यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा संवर्धनाची गरज आणि मराठी भाषेतून होणारा विकास याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले .आधुनिक तंत्रज्ञानात कितीही बदल झाला तरी आपली भाषा व संस्कृती ही जतन केली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. श्री.सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

सुखदा पाटील व सृजन पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधांचे वाचन केले.यानंतर सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते निबंध लेखन स्पर्धेतील व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.यावेळी सुरेश गडकरी,ज्योती मधुकर, बी.बी.शिंदे, शंकर चौगुले, शिवराज चव्हाण , निला आपटे, धीरजसिंह राजपूत, गजानन सावंत, एन. सी  उडकेकर, प्रतापसिंह चव्हाण , प्रसाद सावंत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले व आभार इंद्रजीत मोरे यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या