Type Here to Get Search Results !

न्यायालयाचा हेस्कॉमला दणका

न्यायालयाचा हेस्कॉमला दणका  

मृताच्या वारसदारांना रु. 25, लाख ३५ हजार भरपाई देण्याचा आदेश



बेळगूंदी, ता. १० :  प्रगतशील शेतकरी  विक्रम महादेव पाऊसकर यांचा शेतामध्ये विद्युत भारीत तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता. सदरच्या या दुःखह घटनेला हेस्कोगचा निष्काळजीपणाला कारणीभूत ठवून मयताच्चा वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून व्याजासहीत रु. 25,35,000/- देण्याचा आदेश कायमस्वरुपी लोक अदालतचे सन्मानीय अध्यक्ष थी रविंद्र पढेद व सदस्या - श्रीमती भारती वाळवेकर, श्रीमती चैतना मठपती यांनी नुकताच हेस्कोमला दिला.



या संदर्भात सविसार माहीती अशी की दि. ३०/०१/२०२० रोजी दुपारी 01 चा सुमारास बेळगुंदी येथील शेतकरी मयत कै. विक्रम महादेव पाऊसकर हे आपल्या बेळगुंदी जेभील ऊसाच्या शेतामध्ये उसावरील किडीचा प्रादुर्भाव नाश करभासाठी रोग प्रतिबंधक औषधाची फवारणी करतेवेळी त्याना सदरच्या शेतामध्ये पूर्वीच तुटुन पडलेल्या विद्युतभारीत विजेच्या तारेची कल्पना नसल्याने अचानक सदर तारेचा मयत विक्रम यांना विजेचा धक्का बसलाने त्यांचा जागीच मूलू झाला होता. त्यासंबंधी मयताची पत्नी श्रीमती वैष्णवी विक्रम पाऊसकर यांनी बेळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये सदरच्या घटनेला हेफॉमचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याची फिर्याद दिली होती. मानुसार पोलीसांनी सखोल तपास करुव हेस्कामना अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपणपत्र दाखठ केले होते.

अर्जदारांचाकडून सादर केलेला साक्षी व पुराव्यानुसार कै. विक्रम पाऊसकर यांच्चा मृत्यूला पूर्णपणे हेस्कामचा दुर्लक्षपणा सिद्ध झाल्याने मा. कायमस्वरुपी लोक अदालतच्या न्यायाधिशांनी या घटनेला हेस्कामला जवाबदार ठरवून अर्जदारांचा भरपाई अर्ज मंनूर करून अर्जदारांना मत्रताच्चा मृत्यूची नुकसान भरपाई दाखल रुपये 21,58000/- व त्यावर दावा दाखल केलेल्या तारखेपासून संपूर्ण नुकसान भरपाई भरेपर्यंत 6% टक्के वार्षिक व्याजाने एकुण 25,35000/- रुपये निकालानंतर दोन महीण्या- याआंत देण्याचा आदेश दिला.

अर्जदारांचावतीने बेळगाव बार असोशिएशन्‌चे माजी प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर बी. चव्हाण यांनी काम पाहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या