Type Here to Get Search Results !

मराठीला अभिजात दर्जा मिळावा ; प्रा. आनंद मेणसे


मराठीला अभिजात दर्जा मिळावा ;  प्रा. आनंद मेणसे

बेळगाव, तार.२८ : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे मनोरमा साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक आनंद मेणसे, माजी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण व नवोदित युवा कवी पूजा भडांगे यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत साठे प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती नीला आपटे यांनी मांडले. 


यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे म्हणाले,  आजच्या काळातील पत्रकारितेची जबाबदारी याविषयी मांडणी केली तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज त्यांनी व्यक्त केली मराठी भाषा आपण सर्वांनीच संवर्धित केली पाहिजे जिथे शक्य आहे तिथे लिहिणे यामधूनच मराठी भाषा संवर्धित होईल मराठी भाषेला जर अभिजात दर्जा मिळाला तर यापेक्षाही अधिक कार्य मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी करता येऊ शकेल यासाठी साठे प्रबोधिनीच्या वतीने आजच्या सभेत नवोदित केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा याविषयी ठराव मांडला. पूजा भडांगे यांनी साहित्य लिखाणाची परंपरा व मराठी भाषेतील साहित्य विश्व याविषयी आपल्या व्याख्यानात मनोगत व्यक्त केले तर श्री प्रताप सिंह चव्हाण यांनी आपल्या व्याख्यानात लेखन कौशल्य कसे विकसित करावे याविषयी मार्गदर्शन केले. 

 या कार्यक्रमाला मालोजी अष्टेकर,माया जायाण्णावर, शंकर चौगुले, बी. बी. शिंदे, कृष्णा शहापूरकर, अनिल आजगावकर, प्रसाद सावंत , गौरी चौगुले, धीरजसिंह राजपूत ,विजय बोंगाळे, गजानन सावंत व बेळगाव परिसरातील मराठी भाषा प्रेमी नागरिक उपस्थित होते.  पाहुण्यांची ओळख श्रीमती कमल पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरदा देसाई यांनी केले. आभार प्रदर्शन श्री इंद्रजीत मोरे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या