Type Here to Get Search Results !

वडाची पूजा करतानाच वडाचे झाड कोसळले

वडाची पूजा करतानाच वडाचे झाड कोसळले

खानापूर, ता. २१ : खानापूर जांबोटी मार्गावरील हनुमान मंदिर च्या शेजारी असलेले, व खूप वर्षे जुने असलेले वडाचे झाड, अचानक कोसळले, नेमके त्याच वेळी काही महिला वडाची पूजा करत असताना हे झाड कोसळले. परंतु सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाहीत. बाचोळी येथील नागरीक मारुती गणपती पाटील, हे, त्यांची पत्नी त्याच वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या असल्याने, आपल्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभा होते. नेमके त्याचवेळी अचानक झाड पडले, परंतु सुदैवाने वडाच्या दोन फांद्या पैकी, एक फांदी दुचाकीच्या समोरच्या चाकावर, तर दुसरी फांदी दुचाकीच्या पाठीमागील बाजूला पडली त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून मारुती पाटील थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या दुचाकीचे थोडे नुकसान झाले.

तसेच त्या ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करत असलेल्या महिला व त्यांची पत्नी त्यासुद्धा थोडक्यात बचावल्या. अन्यथा अनर्थ घडला असता. फॉरेस्ट खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. झाड तोडून रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

झाड रस्त्यावर कोसळल्याने थोडा वेळ खानापूर जांबोटी मार्ग बंद होता त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, झाड कोसळले असल्याचे समजल्याने, बघ्यांची गर्दी जमली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या