Type Here to Get Search Results !

बसखाली सापडलेल्या फुलबाग गल्ली येथील वृद्धेचा मृत्यू

 


बसखाली सापडलेल्या फुलबाग गल्ली येथील वृद्धेचा मृत्यू


बेळगाव, ता. ३१ : बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या फुलबाग गल्ली येथील एका वृद्धेचा गुरुवारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

सुमन सुरेश हलगेकर (वय ६५ रा. फुलबाग गल्ली) असे त्या वृद्धेचे नाव आहे. सोमवार दि. ६ मे रोजी सायंकाळी रेल्वे स्थानकाजवळील कारवार बस स्टँडवर ही घटना घडली होती. बसखाली सापडून सुमन या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना त्याच दिवशी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला.


सुमन व कुटुंबीय लग्नाहून परतले होते. सायंकाळी ज्या बसमधून त्या उतरल्या.त्याच बसखाली सापडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. बसमधून उतरताना

चालकाने बस पुढे नेल्यामुळे चाकाखाली सापडून त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर

दुखापत झाली होती. उपचाराचा उपयोग न होत या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सुमन यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या