Type Here to Get Search Results !

सीमा सत्याग्रही शांताबाई भावकू चव्हाण यांचे निधन

 सीमा सत्याग्रही शांताबाई भावकू चव्हाण यांचे निधन

 बेळगाव, ता. ३० : बेळगुंदी येथील रहिवासी श्रीमती शांताबाई भावकू चव्हाण (वय ६८) यांचे सोमवारी (ता.२९) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,  सुना व नातवंडे असा परिवार आहे. कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्मा कै. भावकू चव्हाण यांच्या त्या पत्नी होत. बेळगुंदी ग्रामस्थ कमिटीचे माजी अध्यक्ष शट्टुपा चव्हाण यांच्या मातोश्री होत. त्यांनी देखील सीमा चळवळीतील आंदोलनात सहभाग घेतला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या