Type Here to Get Search Results !

......हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही

 ......हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही



बेळगाव, ता. २३ : फाल्गुन पौर्णिमा अर्थात सोमवार दिनांक 25 मार्च 2024 रोजी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ स्वरुपाचे असणार आहे. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र बिंबास प्रत्यक्ष ग्रहण न लागता चंद्रबिंब फक्त पृथ्वीच्या अंधुक, अस्पष्ट व धूसर छायेत प्रवेश करत असते. 


*हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.* 


न्यूयॉर्क, न्यूझीलंड, मेक्सिको, वॅाशिंग्टन डीसी, कॅनडा, ग्रीनलॅंड इ. ठिकाणी ‘छायाकल्प’ स्वरुपातच हे ग्रहण दिसणार आहे. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत तसेच या ग्रहणाचे नैसर्गिक व जन्मराशी इत्यादीनुसार होणारे परिणाम विचारात घ्यायचे नसतात.

त्याचप्रमाणे भारतातील व भारताबाहेरील सर्व व्यक्तींनी आणि सर्व गर्भवती स्त्रियांनी देखील 25 मार्च 2024 या दिवशी होणाऱ्या छायाकल्प चंद्रग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम व धार्मिक नियम पाळू नयेत.


*©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या