सावधान.... नागरिकांनो : व्हिडिओ लाईक वरून होते आहे फसवणूक
पुणे : ‘‘हाय, मी रेश्मा... डायमंड एलिट कंपनीत रिक्रुटर आहे. आमची कंपनी इन्स्टाग्रामवरील जाहिरातींमध्ये काम करते. तुम्हाला फक्त व्हिडिओला लाइक करायचे आहे. प्रत्येक व्हिडिओसाठी तुम्हाला ५० रुपये देऊ.
मी तुम्हाला तीन व्हिडिओ पाठवीन. तुम्ही लाइक करून स्क्रीनशॉट पाठवा. तीन व्हिडिओंसाठी दीडशे रुपये मिळतील. दिवसाला दोन ते अडीच हजार मिळू शकतात. स्वारस्य असल्यास कळवा,’’ असा संदेश मोबाईलवर आल्यास सावध व्हा. अशा प्रकारे विविध आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
मगरपट्टा परिसरातील अय्यर यांच्या मोबाईलवर संदेश आला. परदेशातील मोबाईल क्रमांक किंवा वेगळ्याच क्रमांकाच्या मोबाईलवरून अशा प्रकारचे संदेश अनेक नागरिकांना मोबाईलवर येत आहेत. अय्यर यांनाही असाच ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याबाबत संदेश आला.
चोरट्यांनी त्यांना टेलिग्रामवर लिंक पाठवली. टास्क पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा तीन हजार ७०० रुपये दिले. त्यानंतर चोरट्यांनी अय्यर यांना दोन लाख ६० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अय्यर यांनी चोरट्यांनी दिलेल्या खात्यात पैसे भरले. परंतु परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अय्यर यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या