पाणी टंचाईवर उपाय म्हणून शहरात आजपासून नवी नळजोडणी बंद
बेळगाव, ता.१६ : - पाणीटंचाईवर उपाय म्हणून बेळगाव शहरात नवी नळ जोडणी न देण्याचा निर्णय कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ व एल अँड टी कंपनीने घेतला आहे.त्यानुसार आज 16 मार्चपासून नव्या नळजोडणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अशी माहिती देण्यात आली आहे. परिणामी शुक्रवारी (ता.१६ ) नळ जोडणीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले.
राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयाचे पुरेसे पाणी असले तरी यंदा उन्हाचा तडाका पाहता एप्रिल व मे या दोन महिन्यात शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.नवीन नळजोडणी दिली तर पाण्याची मागणी वाढेल व टंचाईत भर पडेल असे पायाभूत सुविधा मंडळाचे म्हणणे आहे.त्यासाठी 15 मार्चनंतर नवीन जोडणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या