खास. हेगडे यांच्यावर कठोर कारवाई करा ; दलित संघटनांची मागणी
खानापूर, ता. १५ : घटनादुरुस्ती सारख्या संवेदनशील मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याने तसेच राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या खासदार अनंत कुमार हेगडे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी खानापूर तालुका दलित संघटना महामंडळाने केले आहे. या संदर्भात तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यामार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून अनंत कुमार हेगडे अगोदरच अडचणीत असताना वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पूर्ण एकदा अडचणीत आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या