Type Here to Get Search Results !

बेळगाव,बिदर सीमा भागासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष निधी

बेळगाव,बिदर सीमा भागासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष निधी

मुंबई, ता. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगाव आणि बिदरच्या सीमाभागासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे.लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काल शनिवारी राज्य सरकारकडून विविध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ट्रस्ट यांना एकूण दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये बेळगाव बिदर मधील संस्थांनाही निधी मंजूर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र सरकारकडून 25 लाख रुपये महाराष्ट्र सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निपाणी येथे, बेळगावसाठी 25 लाख रुपये मंजूर तर पंचवीस लाख रुपये रघुनाथ महाराज शिक्षण संस्था बिदर या शाळेच्या बांधकाम समाजासाठी मंजूर केले आहेत. 25 लाख रुपये सत्यम शिवम सुंदरम डेव्हलपमेंट असोसिएशन बिदर,बेळगाव, हॉस्पिटल संबंधी साहित्य खरेदीसाठी निधी मंजूर झाला आहे. ग्रंथालये, शाळांचे वर्ग, हॉल, मेडिकल व्हॅन अशा विविध उपक्रमांसाठी सेवाभावी संस्थांना राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या