कर्नाटकात २६ एप्रिल आणि ७ मे रोजी लोकसभा निवडणुक मतदान
बेळगाव, ता. १६ : देशात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत,.यामध्येही चार राज्यात सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल आणि आंध्र प्रदेश मध्ये जून महिन्यात निवडणुका होणार आहेत. ४ जूनला संपूर्ण देशात मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ला होतील. २६ एप्रिल ला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ७ मे रोजी मतदानाचा तिसरा टप्पा असेल. तेरा मे रोजी मतदानाचा चौथा टप्पा पार पडेल. २० मे मतदानाचा पाचवा टप्पा पार पडेल. २५ मे ला मतदानाचा सहावा टप्पा पार पडेल. एक जूनला मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडेल. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार आहे. कर्नाटकात २६ एप्रिल आणि ७ मे रोजी मतदान होईल. उत्तर कर्नाटकात ७ मे रोजी बेळगाव आणि चिकोडी मध्ये मतदान होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या