बेळगाव, ता. १४ : किटवाडच्या धरणात बुडून बेळगावच्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. उजेब तन्वीर मुजावर, राहणार वैभवनगर बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.
उजेब तन्वीर मुजावर हा मंगळवारी आपल्या शाळकरी मित्रांसमवेत किटवाड धरण परिसरात सहलीसाठी गेला होता. किटवाडच्या पाझर तलावात ही १३-१४ मुले डुबकी मारणे, सेल्फी काढणे अशा कामात दंग होती. याचवेळी लघु पाटबंधारे धरण क्रमांक १ येथे पाण्यात डुबक्या मारणारा उजेब तन्वीर मुजावर बुडाला.
कोवाड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. बेळगाववरून रेस्क्यू टीम देखील दाखल झाली. त्यांनीही बुडालेल्या तरुणाचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला. पण उपयोग झाला नाही.
गुरुवारी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली आणि रेस्क्यू टीमच्या हाती उजेब मुजावर याचा मृतदेह मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या