Type Here to Get Search Results !

समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना अटक

समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना अटक 

बेळगाव, ता. १२ : आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यामध्ये उद्योजकांनी जय महाराष्ट्र म्हंटले म्हणून आयोजकांनी अताताईपणा केला होता. त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेतून संताप व्यक्त करण्यात आला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी त्याचा निषेध सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदविला होता. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.अशी मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी (ता.१२) पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व म्हणून शुभम शेळके यांच्याकडे पाहिले जाते. जय महाराष्ट्र या घोषणेला विरोध दर्शविल्यामुळे श्री.शेळके यांनी आपले परखड मत व्यक्त केले. मात्र, याची झळ विरोधकापेक्षा काही बागुल बुवांना लागली. परिणामी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव घातला. त्यामुळे आज त्यांना अटक झाली.  परिणामी, मराठी भाषेतून  तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या