हुक्का बारच्या दुकानांवर छापा ; 4.50 लाख रुपयांसह हुक्के जप्त
बेळगाव, ता. १३ : बेळगाव पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या हुक्का बारच्या दुकानांवर छापा टाकून तब्बल 4.50 लाख रुपयांचा ऐवज, विविध कंपन्यांचे हुक्के जप्त करण्यात आले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले हुक्का बार व तंबाखूजन्य पदार्थ कुठूनतरी आणून ग्राहकांना विनापरवाना विकले जात असल्याच्या माहितीच्या आधारे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली माळमारुती, मार्केट आणि टिळकवडी पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला.
विविध कंपन्यांचे ६२ हजार रुपये किमतीचे १२६ हुक्के जप्त. 15,500 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 51 रोल पेपर. 20,300 रुपये किमतीचे 30 वेगवेगळ्या कंपनीचे चारकोल. 41,500 रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 120 बोँग पाईप. 25,300 रुपये किमतीची विदेशी सिगारेटची 25 पाकिटे. विविध कंपन्यांच्या तंबाखूच्या पाकिटासह 16,500 रु. विविध कंपन्यांच्या पॉकेटमनीसह एकूण 4.50 लाख किमतीच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या