Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी बेळगावात, रिंग रोड प्रकल्पाची होणार पायाभरणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी बेळगावात, रिंग रोड प्रकल्पाची होणार पायाभरणी



 बेळगाव, ता. २० : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर कर्नाटकातील उत्तरा कन्नड, विजयपूर, बागलकोट, कोप्पल, रायचूर, कलबुर्गी, बिदर या सर्व जिल्ह्यांसाठी सुमारे 376 किलोमीटर लांबीच्या आणि 6975 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग बांधणीच्या कामांना मंजुरी दिली आहे.गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता नितीन गडकरी बेळगाव जिल्हा स्टेडियम येथे महामार्ग पायाभरणी करण्यात येणार आहे.

 


 बेळगाव शहरात १६२२.०४ कोटी खर्चून ३४.४८ किमी लांबीचा ४/६ लेन (रिंगरोड) रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ होणार आहे. 941.61 कोटी खर्चून राष्ट्रीय महामार्ग 548B चिक्कोडी बायपास ते गोटूर पर्यंत 27.12 किमी लांबीच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम.

 887.32 कोटी खर्चून शिरगुप्पी ते अंकली पर्यंत 10 किमी रस्ता रुंदीकरण. 785.79 कोटी खर्चून मुरागुंडी ते चिक्कोडी जवळील 50.2 किमी लांबीच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.  ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात एकूण 4237.12 कोटी रुपये खर्चून 121.8 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. सदर कामांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या