Type Here to Get Search Results !

बंगळुरू शहरात मराठी भाषा दिन साजरा

 बंगळुरू शहरात मराठी भाषा दिन साजरा

कलबुरगी, ता. २७ : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी संस्थेच्या बंगरू विभागातर्फे  राजधानी बंगळुरू येथे मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 बेंगळूरू विभागाच्या अध्यक्षा डॉ.संध्या राजन अणवेकर व कार्यवाह दिपाली वझे यांनी केलेल्या सरस्वती पूजन, दिप प्रज्वलनाने  मराठी भाषा दिन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्पूर्वी अर्चना देसाई यांनी सादर केलेल्या स्वरबद्ध सरस्वती वंदनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.



कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरय्या रे.स्वामी यांच्या योगदानाने बेंगळूरू सारख्या कन्नड भाषेचा प्रभाव असलेल्या अमराठी शहरात कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद आपले पाऊल मांडत आहे. 

 कर्नाटक मराठी साहित्य परिषद बेंगळूरू विभागात कार्यवाह दिपाली महेश वझे यांच्या निवास स्थानी त्यांचे पती डॉ.महेश वझे यांच्या सहकार्याने अतिशय उत्साही

वातावरणात व आत्मीयतेने मराठी दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात बेंगळूरू शहरात दूरवर राहणारे साहित्यिक आवर्जून उपस्थित होते. 

या सोहळ्यात माननीय यशवंत जोशी,योगिनी जोशी,अर्चना देसाई,दत्तराज देसाई,अनंत मिसे,अपर्णा मिसे,शाम वडाळकर,अशोक हवालदार,अरूणा हवालदार,नुतन शेटे, लिना पेंढारकर,गौरी राठोड,परिज्ञा राठोड यांनी बेंगळूरू विभागाच्या पहिल्या मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. 

 धनश्री गायकवाड आणि प्रीती यांनी स्वागतासाठी दारावर मराठमोळी रांगोळीची अप्रतिम सजावट केल्याने येणाऱ्यांचे चेहेरे सुखावले होते.साहित्यिकांनी आपला सविस्तर परिचय देऊन आपली रचना व मनोगत सादर केले.मराठी दिनाची सांजवेळ भाऊक मनाला स्पर्शणारी जीवाभावाची झाली.

या भेटीतून साहित्यिकांना नवी ऊर्जा तर मिळालीच पण या भेटीतून नवकवी, नवोदित साहित्यिकांची निर्मिती होईल यात शंका नाही.अशी प्रतिक्रिया डॉ. संध्या राजन यांनी व्यक्त केली

  कार्यक्रमाची सांगता दिपाली वझे यांच्या मातृभाषा वरील प्रेरणादायी मनोगताने झाली व "मातृभाषा स्पंदनाच्या आत रूळली पाहिजे" ही भावपूर्ण गझल रसिकांच्या थेट ह्रदयात भिडली. 

बेंगळूरू विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या अणवेकर  कार्यवाह दिपाली वझे यांचा शाल पुष्पहार  देऊन मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.शेवटी उपस्थित साहित्यिकांनी महाराष्ट्रीयन पोहे व नारळ पोळीचा स्वाद घेतला.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या