मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती साजरी
बेळगाव, ता. २० : मराठी विद्यानिकेतन मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील मराठी विषय शिक्षिका उज्ज्वला चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व, धाडसी नेतृत्व, अन्याविरुद्ध चीड , व्यवस्थापन कौशल्य, मोठ्यांचा आदर ,स्त्रियांचा सन्मान , धाडसी वृत्ती, निष्ठा , प्रामाणिकपणा,ध्येय वृत्ती असे एक नाही तर अनेक गुण त्यांचे शिकण्यासारखे आहेत.शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास,लढाया, कारकीर्द,आजचे शिवजयंतीचे बदललेले स्वरूप यांचा उलगडा प्रमुख पाहुण्या उज्ज्वला चव्हाण यांनी आपल्या भाषणात करून दिला. सार्थक पाटील या विद्यार्थ्यांने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. यानंतर लाठीची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आली.यामध्ये श्रावणी पेडणेकर, गार्गी गवळी,आयुष गोडसे, समर्थ देसाई, आदित्य चौगुले,तन्मयी पावले,आदिश्री जाधव, आदिती चौगुले या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
शिक्षण संयोजिका निला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.जी.पाटील , शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एम्.पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या