चित्रनगरी : वास्तविकतेवर आधारित प्रेरणादायी असा अमिरखानचा दंगल चित्रपट बहुसंख्य प्रेक्षकांनी पाहिला आहे. या चित्रपटाच नाव आलं की आठवते ती बबिता फोगाट. या बबिता फोगाटची बालपणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे सुहानी भटनागर.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटातून सुहानीने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. मग त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले.
18 व्या वर्षात पाय ठेवल्यानंतर शिक्षणाला पर्याय नाही हे तिच्या ध्यानात आलं आणि तिने कॅमेऱ्यापासून थोडं दूर होत शिक्षणात रस दाखविला. 19 व्या वर्षी प्रसार माध्यमांसमोर बोलताना, आपण आधी शिक्षण पूर्ण करणार आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले होते. पण, नियतीला हे मान्य नव्हते.
सुहानीचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये तिच्या पायाला जखम झाली. उपचारासाठी घेतलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. त्या औषधांचे तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागलं. संपूर्ण शरीरात पाणी साचले. आणि दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना काळानं वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीला हिरावून नेलं. तिचं शिकण्याचं आणि शिक्षणानंतर बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं. आयुष्याची दंगल ती जिंकू शकली नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या