उदोग.... आई उदो... लक्ष्मी माता कि जय !
भंडाऱ्याची उधळण करत, श्री लक्ष्मी मुर्तीची मिरवणूक
बेकिनकेरे, ता. २७ : येथील नुतन जिर्णोद्धार करण्यात आलेल्या ग्राम देवता श्री लक्ष्मी मुर्तीची मिरवणूक उचगाव येथून मुर्तीकार गुंडू सुतार यांच्या निवासस्थानी विधिवत पूजन माजी सैनिक संघटना अध्यक्ष चंद्रकांत गावडे व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले व ग्रामस्थ व लक्ष्मी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित सुरुवात करण्यात आली उदोग.... आई उदो... लक्ष्मी माता कि जय घोषणांच्या गजरात सारा परिसर भंडाराने न्हाऊन निघाला होता. संपूर्ण गाव मिरवणूकीत सहभाग झाला होता.
उचगाव येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी उचगाव येथील महिलांनी जलार्पण व ओटी भरणे कार्यक्रम करत वाजत गाजत मूर्ती सीमेलगत आल्यानंतर मन्नुर गावचेउद्योगपती जयवंत बाळेकुंद्री दांपत्याच्या हस्ते सीमेचे पूजन करून गावात घेण्यात आली यानंतर गणपत गल्ली गवळी गल्ली लक्ष्मी गल्ली येथे कलश मिरवणूक करतं झांज पथक, वारकरी भजनी, ढोल ताशा पथक, धनगर समाज ढोल ताशा यांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत सूर्यास्ताला मूर्ती मंडपामध्ये थांबविण्यात आली.
उद्या सकाळी ठीक नऊ वाजता पुन्हा मिरवणूक निघणार आहे. आज गावातील व परिसरातील भाविकांचा मोठा सहभाग होता गावात गेल्या पासष्ट वर्षांपूर्वी लक्ष्मी यात्रा भरवण्यात आली होती. गावात मंदिर नवीन करण्यात आले असून गावकऱ्यांच्या जल्लोषी वातावरण असून गावात रंगोटी विद्युत रोषनाई करण्यात आली आहे. गावात रोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पाच दिवसांचा कार्यक्रम चालणार असून शुक्रवारी (ता.१) मूर्तीची प्रतिष्ठापना व कळसारोहन, मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या