मतदानाबाबत जागरुकता निर्माण करा: सीईओ राहुल शिंदे
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करावी. मतदार याद्या सुधारित कराव्यात. प्रौढांच्या मतदार याद्यांची माहिती संकलित करावी, अशा सूचना जीपीएमचे सीईओ राहुल शिंदे यांनी दिल्या.
चिक्कोडी शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आजहमंगळवारी चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते. मतदान केंद्रांची व्यवस्थित तपासणी करावी. दुरुस्ती असेल तर ती दुरुस्त करावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांकडे अधिक लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
मतदान अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात यावे. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमात सहभागी व्हावे. लोकसभा निवडणुकीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे. निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी टीम बनून काम करावे, असे ते म्हणाले. चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी महेबुबी तहसीलदार सी.एस.कुलकर्णी, तपम ईओ जगदीश कममर व तालुकास्तरीय एआरओ ईओ आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या