खादरवाडी सरकारी मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव, ता. २४ : खादरवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.
शाळेच्या सभागृहात आयोजित या स्नेहसंमेलनाच्या ज्योतिबा बस्तवाडकर हे होते. त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर व रमेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत लेंगडे संजय, गोटाडकी, जैन, सुजय गोटाडकी जैन, राजन हुलबत्ते मनोहर पाटील, परशराम गोरल, प्रसाद गोरल, आर. एस. खवणेकर, सुनील बागेवाडी, अशोक पिंगट, राजू पाटील, गोपाळ शिवनगेकर व देवाप्पा कोलेकर उपस्थित होते.
प्रारंभी वाय. सी. बागेवाडी यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर मुख्याध्यापक एम. के. कडंगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी श्री सरस्वती फोटो पूजन केले, तर रमेश पाटील यांनी श्रीफळ वाढविले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात रमाकांत कोंडुसकर, संजय गोटाडकी आदींनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या वार्षिक स्नेहसंमेलनास राकेश पाटील, रमेश माळवी, बाळू माळवी, राजू पाटील, कासार सर, सुरेश कडलीकर आदींसह शाळेचे हितचिंतक, पालक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. संमेलनाचे सूत्रसंचालन पी. जी. दळवी यांनी केले. शेवटी सौ. एस. एम. मरगाळे यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या