मंत्री, आमदारांनो शेतकऱ्यांच्या घरी वात्सव करा
बेळगाव - पुढील महिन्यात चार ते पंधरा डिसेंबर दरम्यान बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान विधिमंडळ अधिवेशन दरम्यान हॉटेल,विश्रामगृहात थांबणे ऐवजी शेतकऱ्यांच्या घरी वास्तव्य करून दुष्काळात होणारा वायफळ खर्च थांबवला जावा. अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.
अधिवेशनाचा अनावश्यक खर्च टाळावा, शेतकऱ्यांच्या घरी थांबावे. येथे जेवण व राहण्याचा खर्च शेतकरी घेणार नाहीत. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा अनुभव घेता येईल. यामुळे पाहुणचार मंत्री आमदारांना स्वीकारण्यास सांगावे. असे निवेदन सभापती यु.टी.खादर व पालक सचिव अंजुम परवेज यांच्या नावे शेतकऱ्यांनी दिले आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे. या काळात कोट्यावधी रुपयांचा निधी अधिवेशनाच्या नावाखाली खर्च केला जाणे, हे योग्य नाही. त्यामुळे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचा आमंत्रणाचा स्वीकार करावा. शेतकऱ्यांच्या घरी थांबल्यास विनाशुल्क राहण्याची व जेवणाची व्यवस्था करू, असे मत शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी व्यक्त केले आहे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या