ग्रामस्थांनी वाचला आमदारांसमोर समस्यांचा पाढा
खानापूर, ता. १४ : तालुक्याचे विद्यमान आमदार श्री.विठ्ठलराव हलगेकर हे कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने चन्नेवाडी येथे आले असता ग्रामस्थानी त्यांच्यापुढे अनेक समस्या मांडल्या.
गावात पूर्वीपासून मराठी शाळा होती पण गेल्या काही वर्षापासून ती बंद आहे, विद्यार्थ्यां अभावी ही शाळा बंद पडल्याचे सांगण्यात येते पण वसुस्थिती ही आहे की त्यावेळच्या काही शिक्षकांच्या हवे त्या ठिकाणी बदली या स्वार्थी धोरणामुळे ही शाळा बंद पडली, त्यामुळे पहिली पासूनच्या बालकांना नंदगडला पायपीट करून जावे लागत आहे,एकीकडे प्रत्येकाला शिक्षण यासाठी प्रशासकीय पातळीवर आटापिटा करून योजना राबविली जात असताना तालुक्यातील एक सुशिक्षित गावातील शाळा बंद पडणे हे सर्व शिक्षण अभियानाच्या प्रयत्नाला खीळ घाण्यासारखे आहे, ही गोष्ट आमदारांच्या निदर्शनाला आणून देण्यात आली.गावातील शाळेची जुनी खाजगी इमारत मोडकळीस आली असून ती त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच मुख्य रस्त्यापासून गावचा अर्ध्या किलोमीटरचा संपर्क रस्ता गेल्या बऱ्याच वर्षांपासून रखडलेला असून एक दोन वेळेला गावकऱ्यांनी तो श्रमदानातून तयार केला, त्याचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही, निधी मंजूर होऊनही त्याची पूर्तता झालेली नाही, तरी त्याचे डांबरीकरण करून तो रस्ता पक्का करण्यात यावा, अशीही उपरोक्त मागणी करण्यात आली.
वरील सर्व समस्या गावचा फेरफटका मारून आमदार श्री.विठ्ठलराव हलगेकर यांनी जाणून घेतल्या व वरील सर्व समस्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, यावेळी निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, सुहास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हेस्कॉम कंत्राटदार भरमाजी पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, महादेव ऱ्हाटोळकर, विनय पाटील,सर्वोत्तम पाटील,विक्रम पाटील, निलेश पाटील व इतर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या