Type Here to Get Search Results !

कर्ज न भरल्याने कारागृहात

 कर्ज न भरल्याने कारागृहात रवानगी 



खानापूर, ता.१२ : सोसायटीला दिलेला धनादेश न वटल्याने, सोसायटी कडून दिवाणी न्यायालयात घालण्यात आलेल्या खटल्यातील. फरार कर्जदाराची हींडलगा कारागृहात रवानगी. परिणामी याकडे कर्ज बुडवणाऱ्यांनी बद्दल अद्दल घेण्याची गरज आहे.

खानापूर‌ येथील क्रांती सेना सोसायटी कडून‌ 2014 साली कणकुंबी येथील नागरिक तुकाराम गोपाळ पारवाडकर (वय43) यांने 1 लाख रूपये कर्ज घेतले ह़ोते. परंतू कर्जाचे हप्ते तो व्यवस्थित भरत नसल्याने सोसायटीने त्याच्यावर 2018 साली खानापूर जेएनएमसी न्यायालयात  खटला दाखल केला होता.  न्यायालयात हजर हो ण्यासंबंधी अनेक वेळा न्यायालयाकडून त्याला नोटीस व वॉरंट लागू करण्यात आले होते परंतु तो गेली पाच वर्षे हजर झाला नाही. 



शेवटी खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जांबोटी बीटचे पोलीस कर्मचारी प्रवीण होंदेड व जगदीश काद्रोळी यांनी आज सापळा रचून त्याला त्याच्या कणकुंबी येथील निवासस्थानी ताब्यात घेण्यात आले व आज सायंकाळी खानापूर जेएनएमसी प्रिन्सिपल न्यायाधीश सूर्यनारायण यांच्याकडे हजर केले असता, न्यायाधीशानी  त्याची रवानगी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत हिंडलगा कारागृहात केली आहे.

घडलेल्या या गोष्टीमुळे अनेक सोसायट्यामधून  कर्ज काढून व्यवस्थित कर्ज न भरलेल्या कर्जदारांना यामुळे चाप बसणार आहे

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या