साठे प्रबोधिनीच्या स्पर्धेत ४० स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव, ता. ९ : गुरुवर्य वि.गो .साठे मराठी प्रबोधिनी तर्फे 18 नोव्हेंबर रोजी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .या बाल साहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी बालकथाकारांची निवड करण्यासाठी कथाकथन स्पर्धा व दिवंगत कवी द.रा.किल्लेकर यांच्या स्मरणार्थ सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन मराठी विद्यानिकेतन येथे करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन प्रबोधिनीचे हितचिंतक निवृत्त अबकारी अधिकारी श्री. सुरेश गडकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रबोधनीचे अध्यक्ष जयंतराव नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाषराव ओऊळकर, स्पर्धेचे परीक्षक शैलजा मत्तीकोप . प्रा. मनीषा नाडगौडा, प्रा. परसु गावडे ,श्री बी.बी.शिंदे, प्रबोधिनीचे सदस्य बसवंत शहापूरकर, विजय बोंगाळे ,शिक्षक सी. वाय. पाटील उपस्थित होते. ही कथाकथन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली . प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही गटात मिळून 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातील निवड झालेल्या बालकथाकारांची नावे खालील प्रमाणे -
1) वैभवी मोरे- बालवीर विद्यानिकेतन
2) मनाली बराटे- मराठी विद्यानिकेतन
3) शिवनंदनी धनाजी- मराठी शाळा मणगुत्ती
4) आकांक्षा पावशे- महिला विद्यालय
5) मधुरा मुरकुटे-म.फुले विद्यालय कार्ये
6) समृध्दी पाटील- बालिका आदर्श विद्यालय
7) अथर्व गुरव- मराठी विद्यानिकेतन.
.निवड झालेले बालकथाकार बाल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपल्या कथांचे सादरीकरण करणार आहेत.त्याचबरोबर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी प्राथमिक व माध्यमिक गटातून 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी धिरजसिंह राजपूत ,,इंद्रजीत मोरे ,गजानन सावंत,सीमा कंग्राळकर, रेणू सुळकर , स्वाती जाधव, भारती हनगोजी, वरदा देसाई, सुनीता पाटील, अश्विनी हलगेकर यांनी परिश्रम घेतले सुत्र संचलन व आभार प्रसाद सावंत यांनी मानले.
------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या