कर्नाटकचे अधिवेशन; समितीचा महामेळावा
बेळगाव, ता. १३ : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबर पासून सुरू होणार आहे.या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याबाबत लवकरच जनजागृती सुरुवात होणार आहे. महामेळावा संदर्भात मध्यवर्ती समितीच्या बैठकीमध्ये रूपरेषा निश्चित केली जात आहे.
बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेऊन अधिवेशनाला विरोध केला जाणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीची बैठक लवकरच होणार आहे यावेळी मेळाव्या बाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाने दडपशाही केली तरीही आतापर्यंत झालेले सर्व मिळावे यशस्वी करण्यात आले आहेत. यावेळी ही महामेळावा यशस्वी केला जाईल, असा विश्वास मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला आहे.
--------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या