शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे दौरे ही रद्द
पुणे, ता.१२ : दिवाळी निमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत आले आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शरद पवार एग्रीकल्चर ट्रस्ट या ठिकाणी शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास शरद पवार विद्यानगरी या ठिकाणी गेले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने डॉक्टरांना बोलवून शरद पवारांची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ईसीजीही काढण्यात आला. डॉक्टरांनी शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांचा पुरंदर दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार हे रविवारी सासवड आणि नीरा येथील शेतकऱ्यांशीही संवाद साधणार होते.
--------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या