भाजपाचे तेजस्वी सूर्या , उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची भेट
बंगळुरू, ता.१३ : भाजपाचा दारुण पराभव करत काँग्रेसने मोठ्या बहुमतासह कर्नाटकमधील सत्ता मिळवली होती. मात्र राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदावरून सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्रि डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये सुरू असलेली रस्सीखेच सर्वज्ञात आहे. यादरम्यान, कर्नाटकमधीलभाजपाचे युवा नेते तेजस्वी सूर्या यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे.
दोन्ही नेत्यांमधील ही भेट राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. हल्लीच काँग्रेसच्या काही आमदारांनी डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली होती. तसेच ते मुख्यमंत्री होणार असतील तर आपण पाठिंबा देऊ. असे सांगितले होते. मात्र तेव्हा शिवकुमार यांनी अशा प्रकारची कुठलीही शक्यता फेटाळून लावली होती.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या