नव्वदी गाठली तरीही धावण्याच्या स्पर्धेत सहभाग
बेळगाव, ता. १५ : दिवाळी असो या दसरा या सणांमध्ये युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र रामपूर (ता.चंदगड) येथे दिवाळी पाडव्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी 500 मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला ज्येष्ठांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वय वर्षे 50 ते 90 वर्षापर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन. आज ही मी जिंकू शकतो ही दाखवून दिले. स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आला होता.
तरुण वर्गाला व्यायाम आणि आरोग्याची चांगली सवय लागावी,धावणे महत्त्व त्यांना पटावे यांसाठी या वृद्ध स्पर्धकांच्या आयोजित करण्यात आलेची श्री बाबुराव वरपे सर यांनी सांगितले. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई मंत्रालयातील अप्पर सचिव आदरणीय सुरेशराव नाईक साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच मा.सौ.सुजाता यादव होत्या. प्रमुख उपस्थिती मा.उपसरपंच सौ.शालन घोळसे, ग्रामपंचायत सदस्य -श्री आप्पाजी वरपे (माजी सरपंच), श्री दत्तू(आप्पा) वरपे, श्री विलास नाईक सर, सौ.रुपाली यादव, डॉ.रघुनाथ पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.
तंटामुक्त अध्यक्ष श्री नामदेव गावडे, श्री झिलू यादव, पांडुरंग घोळसे, आप्पा सुतार व युवा वर्ग आणि ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.आभार उद्योजक श्री अमित वरपे यांनी मानले.विशेष सहकार्य श्री गोविंद सुतार व श्री दयानंद गावडे सर यांचे मिळाले.
ज्येष्ठ नागरिक धावणे विजेते.-
1) प्रथम क्रमांक -श्री संभाजी गणाचारी
2) द्वितीय क्रमांक -श्री पांडुरंग घोळसे
3) तृतीय क्रमांक -श्री राघोबा वरपे (वय-89 वर्षे)
50 वर्षांखालील धावणे विजेते.1) प्रथम क्रमांक - निखिल गावडे.2) द्वितीय क्रमांक -विजय तुर्केवाडकर.3) तृतीय क्रमांक -शुभम वरपे.
🌸 रस्सीखेच खुला गट-1) प्रथम क्रमांक - धैर्यशील यादव ग्रुप. 2) द्वितीय क्रमांक - सुधीर वरपे ग्रुप.......... स्पर्धेचे प्रमुख आकर्षण श्री राघोबा वरपे (वय-89 वर्षे) माजी तंटामुक्त अध्यक्ष रामपूर.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या