बाल दिनानिमित्त शाळेत भरला बाजार
बेळगाव, ता. १५ : मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका नम्रता पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत , सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.जी.पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन लता पाटील यांनी केले.
प्रकल्प प्रकल्पांचे उद्घाटन
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता व आरोग्य, आहार,पाणी, गडकिल्ले या विषयावरील प्रकल्प प्रदर्शन वर्गात भरविण्यात आले.विज्ञान शिक्षिका सविता पवार, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बी .बी.शिंदे, डी. एस्. मुतगेकर यांच्या हस्ते चारही प्रकल्पांचे फीत कापून, आहाराची चव चाखून, पाण्याला रंग नसतो या प्रयोगांतंर्गत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित विषयावरील गाणी, माहिती, नाटुकली सादर करून प्रकल्प मांडणी केली. यासाठी दिप्ती कुलकर्णी, जयश्री पाटील, कमल हलगेकर, नम्रता पाटील, उषा पाटील, मुक्ता आलगोंडी, शैला पाटील, धीरजसिंह राजपूत, प्रतिभा पाटील, बी.जी.पाटील स्नेहल पोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
*दुकानजत्रेचे उद्घाटन*
बालदिनाचे औचित्य साधून दुकान जत्रा भरविण्यात आली.माजी विद्यार्थी शुभम अतिवाडकर, नमिता ताशिलदार, साईनाथ बडमंजी यांच्याहस्ते दुकान जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये वडापाव, भेळ, सरबत, पॉपकॉर्न, पाणी पुरी, सेंद्रिय भाजी ,फनी गेम्स यांसारखे स्टॉल मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजावा, खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव , नफा -तोटा याचे ज्ञान मिळावे असा यामागचा उद्देश होता. हा कार्यक्रम मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, सांस्कृतिक विभागाचे बी. जी. पाटील, लता नगरे, श्रुती बेळगावकर व सर्व शिक्षकांनी मिळून यशस्वी केला.
--------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या