उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन
बेळगाव, ता. ४ : बेळगुंदी येथे आरोग्य शिबिराचे रविवारी (ता.५) आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात संधिवात ऑस्टियोपोरोसिस, हाडांच्या आरोग्याच्या समस्या, पाठदुखी, गुडघा आणि कोपर यांच्या अस्थिबंधनाच्या दुखापती आणि हिप जॉइंट्स किंवा तत्सम आजार, जुने वेदनादायक फ्रॅक्चर आणि दुर्लक्षित जखम असलेल्या रुग्णांसाठी मोफत सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक्स तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कृपया तुमचे जुने एक्सरे आणि रिपोर्ट सोबत घेउन येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जुन्या ऑस्टिओपोरोसिस रुग्णांसाठी बीएमडी मशीनद्वारे मोफत तपासणी केली जाणार आहे. डॉ सारंग शेटे यांच्या आर्थोलाइफ ऑर्थोपेडिक्स क्लिनिकच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन केले असून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी 10 वाजता तपासणीला सुरुवात होणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या