बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे
भारतासह जगभरात गेल्या काही काळापासून सातत्यानं काही अशा घटना घडल्या ज्यामुळं अनेकांचीच चिंता वाढली. काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये आलेल्या अतिप्रचंड भूकंपामध्ये शेकडो बळी गेले. तत्पूर्वी तुर्की आणि अफगाणिस्तानमधील भूकंपानंही मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता आणखी एका संकटाची भर पडली आहे. कारण, मंगळवारी सकाळी (7 ऑक्टोबर) बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटे 5 वाजून 32 मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये 10 किमी खोलीवर या भूकंपाचं केंद्र होतं. तर, भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती. अंदमान आणि निकोबार बेटांपासून दूर झालेल्या या भूकंपामध्ये सध्या तरी कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या