Type Here to Get Search Results !

तरुणाची हत्या; आरोपीच्या घरावर दगडफेक

तरुणाची हत्या; आरोपीच्या घरावर दगडफेक

बेळगाव, ता. १३ : पूर्व वैमनस्यातून गोकाक मध्ये युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची घटना घडल्या नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


तरुणाची हत्या होत झाल्यावर आंदोलकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ठिकठिकाणी या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील येथील आदिजांब नगरात ही घटना घडली.


पेट्रोल पंपावर काम करणारा शानूर पुजारी (२७)असे या घटनेत बळी गेलेल्या युवकाचे नाव आहे. हत्येचा प्रकार घडत असतानाच दुसऱ्या गटाने आरोपीच्या घरावर दगडफेक करून दुचाकी व कारचे नुकसान केले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.बरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी केएसआरपीचे पथक तैनात करण्यात आले आणि तात्काळ खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्थानका जवळ गर्दी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या