Type Here to Get Search Results !

या गावातील गावकरी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन


जिल्हाधिकाऱ्यांना गावकरी देणार निवेदन


 बेळगाव, ता.१३ : बिजगर्णी येथील गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवाण्यासाठी सर्वे करण्याच्या मागणीसाठी गावातील सर्व समाज्याच्यावतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्याल्यावर मोर्च्या काढून गुरुवारी दि 16 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्याचा निर्णय आज झालेल्या गावाकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.


महालक्ष्मी यात्रेच्या निमित्याने आयोजित बैठकीत गायरान आणि ग्रामस्थ कमिटीचा विस्तार यावर चर्चा झाली. गायरानामध्ये अनेकांनी तसेच एका बड्या राजकीय व्यक्तीने अतिक्रमण केल्याने या संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन सर्वे करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला दलित समाजानेही पाठींबा दर्शवला. ग्रामस्थ कमिटीनेहि पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानुसार गुरुवारी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेच्या निमित्याने ग्रामस्थ कमिटीमध्ये चार जागा दलित समाजाला देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष वसंत अष्टेकर यांनी बोलताना,  गायरानसोबत इतर जमीन अबाधित ठेवण्याची जबाबदारी सगळ्या गावाकऱ्यांची आहे. यावेळी परशराम कांबळे यांनी बोलताना म्हणाले, गायरान जमिनीवर फक्त दलित समाजाने अतिक्रमण केले नसून दलितांच्या आडून एका राजकीय व्यक्तीने केल्याचा आरोप यावेळी केला. 


यावेळी वसंत अष्टेकर, श्रीरंग भास्कळ, दामू मोरे, विष्णू मोरे, यल्लाप्पा बेळगावकर, बंडू भास्कळ, पुंडलिक जाधव, मारुती जाधव, जकाप्पा मोरे, नारायण चौगुले, जोतिबा मोरे, नारायण भास्कळ, संदीप अष्टेकर,

दीपक कांबळे, कल्लाप्पा अष्टेकर, परशराम कांबळे, मारुती कांबळे, संजय कांबळे, पुंडलिक कांबळे, लक्ष्मण कांबळे, प्रकाश भास्कळ आदी गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या