स्वच्छतेबाबत कोल्हापूरच्या भक्तांचा इशारा
कोल्हापूर : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा होणार आहे. या यात्रेला कर्नाटकासह महाराष्ट्रातील रेणुका देवीचे भक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान प्रत्येक वर्षी डोंगरावर जाण्यापूर्वी भाविक जोगनभावी कुंडावर पवित्र स्नानासाठी जात असतात. मात्र या महत्त्वाच्या जागेची दुर्दशा आणि अस्वच्छता झालेली पाहायला मिळते. त्यामुळे यावर्षीच्या यात्रेत जोगनभावी कुंडाची स्वच्छता केली जावी. याची जबाबदारी कोल्हापुरातील मानाच्या चार जगांवर सोपविण्यात आली आहे. यात्रेदरम्यान जोगनभावी कुंडाची स्वच्छता झाली नसल्यास, जोगनभावी कुंडाकडे कोल्हापूरातील भाविकांच्या एकही बस जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे यांनी आज सोमवारी ( ता. ६ ) सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
याचा विचार करून यात्रेपूर्वी सौंदत्तीला जाणाऱ्या मानाच्या चार जगांनी जोगनभावी कुंड परिसर स्वच्छ राखला जावा, कुंडातील पाणी स्वच्छ असावे, कुंडाच्या पायऱ्या व आसपासचा परिसर स्वच्छ असावा. स्नानाचे शॉवर पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र आणि बंदिस्त असावेत. या ठिकाणी स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी यासंदर्भात प्रयत्न करावेत. यात्रेपूर्वी स्वछतेची कामे पूर्ण केली जावी. जर कुंडाची स्वच्छता, व अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास, कोल्हापूरातील रेणुका भक्तांच्या एकही बस जोगनभावी कुंडाकडे जाणार नाही, असा इशाराही युवराज मोळे यांनी दिला आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, सरचिटणीस गजानन विभुते, कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, संस्थापक सुभाष जाधव, अच्युत साळुंखे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या