अतिक्रमण हटविण्याची मागणी
बेळगाव, ता. ६ : तालुक्यातील बिजगर्णी ग्राम पंचायात हद्दीतील येत असलेल्या गायरान जमिनीवर. एका कुटुंबियाने बेकायदेशीर अतिक्रम करून शेड उभारले आहे. अशी तक्रार करत ते अतिक्रम त्वरित हटाविण्यात यावे, अशी मागणी ग्राम पंचायातच्या वतिने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (ता. ६) निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील बिजगर्णी ग्राम पंचायात हद्दीतील तालुका पंचायात च्या नावे असलेल्या सरकारी जमिनीवर एका कुटुंबियाने बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी करून आपला आक्षेप ग्राम पंचायात व ग्रामस्थाकडून जिल्हाधिकारी यांच्या कडे नोदविण्यात आला. सोमवारी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यावर कडक कारवाई करावी शिवाय ते अतिक्रमन त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. गावात गायरान जमीन म्हणून तब्बल ७२ एकर जमीन आहे. त्यापैकी काही एकर जमीन तालुका पंचायतीच्या नावे आहे. त्या जमिनीवर अतिक्रमन झाले आहे. त्यामुळे गावात याविषया संदर्भात वारणवार तनावाचे वातावरण निर्माण होत आहे. शिवाय अतिक्रण करणारा व्यक्ती सरकारी अधिकाऱ्यावर दबाव टाकुन धमकविण्याचे प्रकार करत असून यांना त्या कारणाने दाखवा नोटीस बजावत आहे. परिणामी सरकारी व विकासाच्या कामात अडतळा निर्माण होत आहे. त्याच बरोबर यासंदर्भात गावातील काही लोक अतिक्रण हटाविण्यासाठी गेले असता. त्यांच्यावर अरेरावीची भाषा व ऍट्रॉसिटी गुन्हा घालेन असे धमकविण्याचे प्रकार होत आहे. अतिक्रण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायात अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी केले यावेळी ग्राम पंचायात सदस्य बबलू नावगेकर, शीतल तारिहाळ्कर, संदीप अस्टेकर, सागर नाईक, महेश पाटील, जोतिबा पाटील, मनोहर पाटील,सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या