विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजणार?
बेंगळुरू, ता. १५ : भाजपाने आता कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती केलेली असली तरी विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्तच आहे. त्यामुळे या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. मलाच विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी यत्नल आणि बेल्लाड यांना अपेक्षा आहे. लवकरच कर्नाटकमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची एक बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विजयेंद्र हे लिंगायत समाजातून येतात. यत्नल आणि बेल्लाड हे दोन्ही नेतेदेखील याच समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड होण्याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेतृत्व विरोधी पक्षनेतेपदासाठी वोक्कालिगा किंवा अन्य ओबीसी नेत्याची निवड करण्याची शक्यता आहे.
---------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या