Type Here to Get Search Results !

चिक्कोडीतून धनगर , बेळगावातून लिंगायत उमेदवार

चिक्कोडीतून धनगर , बेळगावातून लिंगायत उमेदवार 



 बेळगाव, ता. १३ : काँग्रेस पक्षाकडून बेळगावमध्ये लिंगायत आणि चिक्कोडीतून धनगर समाजाच्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.


शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. लोकसभेचे उमेदवार कोण असतील यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षाची बैठक घेऊन त्यावर निर्णय होणार आहे. यासंदर्भात जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर सतत संपर्क ठेवला जात आहे


माजी आमदार आमदारांना विश्वासात घेऊन हाय कमांडच्या ग्रीन सिग्नलवर उमेदवार ठरवला जाईल असे मंत्री जारकिहोळी यांनी पुढे नमूद केले. चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात लिंगायत आणि धनगर समाजामध्ये लोकप्रिय असणाऱ्या तसेच जनतेत सतत संपर्कात असणाऱ्या पक्षातील वजनदार इच्छुकाला उमेदवारी देण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या