Type Here to Get Search Results !

सोशल मीडियावर ब्लॅकमेल

 सोशल मीडियावर ब्लॅकमेल ; एकाला अटक 

बेळगाव, ता. १ : बेळगाव जिल्ह्यात डीपी फेक प्रकरण उघडकीस आले असून फोटो एडिट करून त्याला अश्लील स्वरूप देण्याद्वारे एका युवतीला सोशल मीडियावर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकास खानापूर पोलिसांनी गजाआड केले आहे.


मंथन पाटील (वय 22, रा. खानापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून त्याच्या विरोधात खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख डॉ भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे.


याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, खानापूर येथील मंथन पाटील हा बेंगलोर येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्याचे गावातील एका युवतीवर प्रेम जडले होते. मात्र संबंधित युवतीने त्याला कोणताच प्रतिसाद न देता त्याचे प्रेम झिडकारले. त्यामुळे चिडलेल्या मंथन याने माझ्या प्रेमाला नकार दिलास तर तुझे चारित्र्य हनन करीन असे धमकावत त्या युवतीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

तसेच सोशल मीडियावर तिच्या नावे खोटे अकाउंट उघडून तिच्या फोटोला एडिट करण्याद्वारे अश्लील स्वरूप देऊन तो फोटो त्याने व्हायरल केला. सदर प्रकार निदर्शनास येताच त्या युवतीने खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला. तसेच तात्काळ कारवाई करत मंथन पाटील याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या