उद्या ''सकल मराठा'' ची बैठक
बेळगाव , ता. १ : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक २ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता जत्तीनमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या बैठकीला बेळगाव परिसरातील समस्त सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या