40 जिवंत बॉम्ब ताब्यात; एकाला अटक
रामनगर : रामनगर पासून जवळ असलेल्या असू गावाजवळील असणाऱ्या जंगलमय प्रदेशात जंगली प्राणी मारून त्याची चामडी व इतर भाग विदेशात विकण्याच्या हेतूने जंगलातील विविध भागात बॉम्ब ठेवण्यात आल्याची बातमी रामनगर पोलिसांना कळताच, शिमोगा येथील सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी त्याच्या जवळून साधारणपणे 40 जिवंत बॉम्ब ताब्यात घेण्यात आले आहेत. तर जंगलात ठेवण्यात आलेले बॉम्ब डॉग स्कॉड च्या साहाय्याने शोधण्याची मोहीम चालू करण्यात आली आहे. सदर बॉम्ब बाळगल्या प्रकरणी रजपूत राजसिंग (वय 57) राहणार शिमोगा याला अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाही रामनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बसवराज मबनूर, यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णकांत पाटील, उमेश देमन्नावर, हालप्पा, नामदेव कंकळी यांनी केली . स्थनिकांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी, गेल्या अनेक वर्षांपासून “असू” भागात भात कापणीच्या हंगामात रान डुक्कर मारण्यासाठी या भागात येऊन जंगलात विविध ठिकाणी जिवंत बॉम्ब ठेवत होता. व मारलेल्या डुक्कर चे मांस किलो च्या भावाने वाटे लावून विकत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे येथील वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते
-----------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या