मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडापटूंचे विविध स्पर्धांत यश
बेळगाव, ता. ३१ : म्हैसूर येथे नुकत्याच पारपडलेल्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप खुल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदिती पाटील हिने 45 किलो वजनी गटात 61 किलो वजन उचलत कांस्यपदक पटकाविले. तसेच तसेच श्रद्धा पाटील हिने 87 अधिक वजनी गटात 60 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले आहे. शाळेच्या क्रीडा शिक्षिका पूजा संताजी यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा प्रकारात विद्यार्थी यशस्वी झाले.
बेळगाव जिल्हा पातळीवर झालेल्या कराटे क्रीडा प्रकारात कल्याणी तशिलदार या विद्यार्थिनीने 45 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे आणि कल्याणीची राज्य पातळीवर होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धा 17 नोव्हेंबर 2023 रोजी शिमोगा येथे होणार आहेत.
26 ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सरिता पाटील या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे सरिताची राज्यपातळीवर होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण संयोजिका निला आपटे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, पूजा संताजी, श्रीधर बेन्नाळकर, योगेश पाटील शिक्षकवर्ग यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
-----/-------–-----------
.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या