पाऊस झाला तरच पिके मिळणार
गेल्या महिन्यात तालुक्पायाच्या काही भागात हलका व मध्यम पाऊस झाला होता. त्यामुळे कोमेजून जाणाऱ्या पिकांना जिवदान मिळाले होते. सध्या सर्वच पिके फळ धरणीच्या तोंडावर आली आहेत. रताळी काढणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र, यावेळी रताळी लागवडीचे क्षेत्र अधिक असल्यामुळे काढणीचा हंगाम लाबण्याची शक्चता आहे. दरवर्षीच्या प्रमाणात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे रताळ्यांची आकार वाढ कमी झाली आहे. आता याची वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. भातपिकांही पावसाची नितांत गरज आहे. काही भागात भात पिकांवर तांबरे रोगाचा प्रार्दुभाव झालेला दिसून येत आहे. याचबरोबर किडीचे प्रमाणही दिसून येत आहे. भुईमूग फळधरणीला सुरूवात झाली असून पाऊस नसल्यामुळे शेंगा रिकांमी राहण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा पूर्णता संपला असून पावसाची अंत्यत गरज निर्माण झाली आहे.
---------------------------
- विजच गायब ....
सध्या कर्नाटक सरकारकडून मोफत विज दिली असून याचा परिणाम आतापासून दिसू लागला आहे. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. शेतकरी पंपसेटद्वारे पिकांना पाणी सोडण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, हेस्काॅमने विजेचा तुटवड्याचे कारण पुढे करत. विजपुरवठा खंडित केला आहे. सात ऐवजी 3 तास विज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून दिवसा सात तास सुरळीत थ्रीफेज वीज पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.
----------------------------
- प्रतिक्रया
पिकांना पावसाची गरज असून रताळ्यांना अधिक गरज आहे. जर पाऊस झाला नाही. तरी पिकांना जमिनीतच किड लागण्याची शक्यता आहे. भातालाही पाण्याची गरज असून येत्या चार ते पाच दिवसात पाऊस झाल्यास पिकांना अधिक उपयुक्त ठरणार आहे. वीज सुरळीत नसल्यामुळे पंपसेटद्वारे पाणी सोडणे मुश्किल झाले आहे. तरी हेस्काॅमने विज पुरवठा करावा.
गजानन शहापूरकर
शेतकरी, बेळगुंदी
--------------------------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या