जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश....
बेळगाव, ता. ३१ : सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने या चार नेत्यांना बेळगावात 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाच्या सायकल फेरी अथवा जाहीर सभेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. असे आदेशाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.३१) बजावले.
1956 पासून बेळगाव कारवार, निपाणी बिदर, भलकिसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा. अशी मराठी भाषिकांकडून मागणी झाली. मात्र, केंद्राने भाषेवर प्रांतरचना करून बेळगावसह बहुभाषिक मराठी भाग म्हैसूर राज्यात समावेश केला. या विरोधात बेळगावात म. ए. समितीकडून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला जातो. दरवर्षीप्रमाणे बुधवारी (ता.१) सायकल फेरी आणि सभा घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते.
31 ऑक्टोबर सायंकाळी 6 पासून 2 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजे पर्यंत या चारही महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितिच्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनी सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि १ खासदार येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते २ नोव्हेंबर सायंकाळ पर्यंत हा प्रवेश बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. परिणामी बेळगावचे वातावरण तापले आहे. नेहमी असा आदेश काढला जात असून महाराष्ट्रातील नेतेही केवळ अश्वासन देत आले आहे. यावेळी तरी आदेश जुगारून मंत्री काळ्या दिनाच्या फेहरित सहभागी होणार का याकडे सर्व सिमावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
--------------------
त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेरावघालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे.
त्या बरोबर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील,दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या