काळ्या दिनाला उपस्थित राहण्याची शिवसेनेकडून विनंती
बेळगाव, ता. २९ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि आमदार सचिन अहिर आणि अरुण दुधवडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करून 'बेळगाव, कारवार, निपाणी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, शिवसेना झिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनाला उपस्थित राहण्याची सीमावासीयांच्या विनंती केली.
दोन दिवसांनी येऊन ठेपलेल्या 1 नोव्हेंबरच्या काळा दिनाच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने बेळगाव निघणाऱ्या फेरीत सहभागी होण्याचे निवेदन देण्यात आले. मात्र सचिन अहिर म्हणाले की, सध्या ही तात्पुरती बैठक असली तरी आम्ही भेटणार आहोत. भविष्यात बेळगाव स्वतंत्रपणे आणि सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा करू. दिले सचिन अहिर आणि अरुण दुधवडकर आजरा येथे त्यांच्या खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईहून बेळगाव विमानतळावर आले होते. बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोर्ले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली. उपशहरप्रमुख राजू तुडयेकर प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, पिराजी शिंदे, दत्तात्रय पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
---------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या