अखेर ठरलं.... पुढील वर्षी श्री लक्ष्मी यात्रा
गेल्या वर्ष भरापासून चर्चेत सलेला यात्रेचा विषय अखेर संपुष्टात आला. सोमवारी ( ता. २२) सकाळी गावातील ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने श्री महालक्ष्मी यात्रा 2024 मध्ये भरविण्याचा निर्णय घेऊन, खंडेनवमी धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पडले. गावातील मुख्य गल्लीतून वाजत गाजत देव देवतांना साहित्यची मिरवणूक काढत धार्मिक विधी व गाऱ्हाणे घालण्यात आले. मंदिरात सकाळपासूनच भक्तांची झाली होती. मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला भांडाऱ्याची उधळण करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त गावामध्ये कडक वार पाळण्यात आला होता. त्यानंतर रथ बनविण्यासाठी लागणारे लाकूड, शस्त्र आदींचे खंडेनवमी निमित पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. साधारण दसरा झाल्यानंतर अनेक धार्मिक कार्यक्रामाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या एप्रिल - मे महिन्याच्या शेवटच्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यात्रा भरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या