इस्राइल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती पुण्यात....
पुणे / बेळगाव, ता. २३ : इस्राइल-हमास युद्धाचा आजा १७वा दिवस आहे. हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात इस्राइलने युद्ध पुकारले आहे. गेल्या १७ दिवसांपासून इस्राइलकडून गाझा पट्टीत रॉकेट हल्ले सुरु आहेत.
बॉर्डरवर इस्राइलने आपलं सैन्य देखील उभं केलं आहे. या युद्धाचे पडसाड पुण्यात पाहायला मिळाले. एकंदर पुण्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आलं.पुण्यातील रस्त्यांवर इस्राइल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टिकर्स लावण्यात आले आहेत. जाणून बुजून रस्त्यांवर हे राष्ट्रध्वजाचे स्टिकर चिटकवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुणे शहरातील 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या सगळ्या गुन्ह्यांमध्ये शहरभरातून एकूण 6 आरोपींची ओळख पटली आहे.चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावरती इस्राइलच्या राष्ट्रध्वजाचे फोटो असलेले स्टिकर्स चिटकवण्यात आले होते. पोलिसांकडून संबंधित ठिकाणी जात सर्व स्टिकर्स काढण्यात आले आहेत
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या